maharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
02 डिसेंबर 2024 | सोमवार
- लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासूनच रक्कम वाढवायची, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागण्याची चिन्हं
- महायुतीत मंत्री होण्यासाठी जावं लागणार अमित शाहांच्या कसोटीतून, शाहांनी मागवलं मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड, दिल्लीतील बैठकीची इनसाईड स्टोरी माझाच्या हाती
- एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून गृहखात्याच्या मागणीवर ठाम असल्याचा स्पष्ट मेसेज दिला, बॉडी लँग्वेजही बदलली
- यूपीतील शेतकरी आठवडाभर दिल्लीकडे कूच करणार नाहीत: अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन झाला करार, दुपारी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले होते
- मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या वाढविण्याविरोधात याचिका: SCने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर; सध्या एका मतदान केंद्रावर 1500 मतदार
- राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा महासागर: आज नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण दुःखी, नितीन गडकरी यांच्या विधानाची चर्चा
- महायुती सरकारचा शपथविधी का लांबला?: छगन भुजबळ यांनी सांगितले खरे कारण; म्हणाले – मोदी, शहा व्यस्त असल्याने मुहूर्त लांबला
- अजित पवार आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर: अमित शहा यांची घेणार भेट; एकनाथ शिंदेंच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर होणार भेट
- मंत्रिमंडळात कुणाची लागणार वर्णी?: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले
- एकनाथ शिंदे यांचा सत्तेबाहेर राहण्याचा विचार: पण आमच्या विनंतीमुळे ते सत्तेत सहभागी होत आहेत, आमदार भरत गोगावले यांचा दावा
- एकनाथ शिंदेंनी आजच्या साऱ्या बैठका रद्द केल्या, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यानं ठाण्यातच करणार मुक्काम
- मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण, पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद नाकारल्याची माहिती
- ज्या मागण्या शिंदेसेना करतायेत त्यावर भाजपने ठरवलं तर एका मिनिटात त्यांना चिरडून टाकतील, संजय राऊतांची बोचरी टीका
- ताप काय आला, दरे गावात काय गेले, शेवटी BJP सांगेल तेच करायचंय, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना टोला, ईव्हीएमवरही घेतला आक्षेप
- बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
- संघाचे एजंट असलेल्या नाना पटोलेंनी नागपुरातील काँग्रेस जाणूनबुजून खिळखिळी केल्याचा बंटी शेळकेंचा आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
- विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
- गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र मतदारसंघातील कामं आणि निधीसाठी एकदाही फोन केला नाही, बच्चू कडूंचा आरोप
- ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवणाऱ्या सोलापुरातील मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू, मतदान घेतल्यास कारवाई करण्याचा प्रशासनाचा आदेश
- राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज
- ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श दुसऱ्या कसोटीसाठी फिट: मुलाखतीत म्हणाला- शरीर एकदम ठीक आहे; पर्थ कसोटीत दुखापत झाली होती
- क्राइस्टचर्च कसोटी- इंग्लंडने न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय मिळवला: ब्रूकने 171 धावा केल्या, ब्रायडन कार्स सामनावीर; WTC मध्ये भारताला फायदा
सौजन्य –
हॉटेल जयनिला,सांगोला
मो.8007812004