maharashtra
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद : उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सध्या महाराष्ट्र व कर्नाटक सीमा वाद प्रश्न गाजत आहे.
त्यातच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे हा प्रश्न चिघळत आहे.
दरम्यान या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निर्णय लागण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज निपाणीत आंतरराज्य पोलिसांची एक महत्त्वाची बैठक झाली.
सीमा वादाच्या सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. दरम्यान या सुनावणीनंतर नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच उद्या सर्वत्र कडक बंदोबस्त राहणार आहे. उद्याच्या निकालानंतर कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये तणाव होण्याची शक्यता आहे. परिस्थिती बिघडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. उद्या निकाल काहीही लागला तरी नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.