टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

फाशी तर फाशी हो …’जन्नत’मध्ये मला अप्सरा मिळेल

Follow Us:

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी पोलीस वेगाने तपास करत आहे. मुंबई, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा पाच राज्यांमधून पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले. सोमवारी पोलिसांनी श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र जप्त केली आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसात आफताबने डेटिंग ॲपवर एका मुलीशी मैत्री केली होती, यानंतर तिला आफताब घरी घेऊन आला होता. 

हत्येच्या काही दिवसातच आफताबने दुसरी गर्लफ्रेंड पटवली होती. त्याने या नव्या गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून एक अंगठी भेट दिली होती. जी अंगठी श्रद्धाची असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांनी ती अंगठी जप्त केली आहे. 
आफतबाच्या या दुसऱ्या गर्लफ्रेंडचीही दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. ही मुलगी पेशाने डॉक्टर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मी आनंदाने फाशी जाईल, स्वर्गात मला अप्सरा मिळेल, असे आफताबने म्हटले आहे. श्रद्धासोबतच्या नात्या दरम्यान त्याने २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now