maharashtra
छत्रपती शिवराय जुन्या काळातील आदर्श; राज्यपालांचे पुन्हा वादग्रस्त विधान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे, असे त्यांनी म्हटले.
आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला. या कार्यक्रम सोहळ्यात कोश्यारी बोलत होते. राज्यपालांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहेत. गडकरींनी देशात चांगले रस्ते बनवले आहेत. लोक तर आता त्यांना गडकरी ऐवजी रोडकरी म्हणू लागले आहेत.
- गडकरींची स्तुती करताना राज्यपाल शिवाजी महाराजांना मात्र जुने आदर्श असे बोलून गेले आणि विरोधकांना आयते कोलीत मिळाले. राज्यपालांच्या विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.