sports
बीसीसीआयचा धमाका! तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगळे कॅप्टन आणणार
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. संघ उपांत्य फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडला होता. यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पराभवाचे पोस्टमार्टम करण्यास सुरुवात केली आहे.
BCCI ने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली. येत्या काही दिवसांत बीसीसीआय कर्णधार रोहित शर्माबाबत देखील मोठा निर्णय घेऊ शकते. बीसीसीआयने नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवण्यासोबत काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. टीम इंडियाच्या नव्या निवड समितीचे पहिले काम वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार बनवणे असेल.
जेव्हा नवीन निवड समिती कार्यभार स्वीकारेल तेव्हा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार निवडणे बंधनकारक असेल. याचा अर्थ असा आहे की, बीसीसीआय आता तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.
अशा स्थितीत रोहित शर्मा यावेळी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी होईल, अशी आशा सर्वांनाच होती. पण रोहित आयसीसी नॉकआऊट सामन्यांमध्ये टीम इंडियाचा निराशाजनक रेकॉर्ड सुधारू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही रोहितच्या कर्णधारपदाचा बेरंग दिसला. संपूर्ण स्पर्धेत त्याची फलंदाजी खराब राहिली.