maharashtra
राऊत यांची अटक बेकायदेशीर, ईडीने मर्जीने आरोपी निवडले
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या घरात छापेमारी करून ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. संपूर्ण चौकशी अंती ईडीने त्यांना अटक केली. ३१ जुलै रोजी त्यांना अटक झाली आली होती. मात्र, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती, असा महत्त्वाचा निर्वाळा पीएमएलए कोर्टाने दिला. यावरून कोर्टाने ईडीला झापले आहे.
पीएमएलए कोर्टाने १२२ पानी आदेशपत्र जारी केले आहेत. राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर होती. या प्रकरणात ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले. राकेश आणि सारंग वाधवान हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
राऊत आणि प्रविण राऊत यांना अवैधरित्या पकडले, असे पीएमएलए कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. तसंच, संजय राऊत आरोपी आहेत, याचे पुरावे द्या, असेही कोर्टाने ईडीला म्हटले आहे.