maharashtra
सहानुभूती दाखवून भाजपने अंधेरीत नोटाचा प्रचार केला
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. त्यांना १६ व्या फेरी अखेरीस ५८ हजार मते मिळाली असून जवळपास १२ हजार लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळं याच मुद्द्यावरून माजी मंत्री अनिल परब यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. अंधेरीत भाजपनं उमेदवार मागे घेतला परंतु नोटाचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपनं त्यांचा उमेदवार मागे घेतल्यानंतर मी त्यांचे आभार मानले होते. परंतु त्यांनी ऋतुजा लटकेंप्रती सहानुभूती दाखवत अंधेरीत नोटाचा प्रचार केला. भाजपनं माघार घेऊन लटकेंना पाठिंबा देण्यात काहीही अडचण नव्हती. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केल्याचा आरोप परबांनी केला आहे.