maharashtratop news

वाढेगाव : लग्नानंतर एका महिन्यातच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू 

विरह सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या

सांगोला – पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने पतीच्या तिसऱ्या दिवशीच ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना गुरुवार ९ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास वाढेगाव ता सांगोला येथे घडली. अनिता निखिल घोंगडे -२३ असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून , पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा ५ डिसेंबर २०२४ रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर ८ डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाचे रिसेप्शन पार्टीही दिली होती. घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मात्र‌ मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिस मानसिक धक्का बसल्याने ती नि:शब्द होती. बुधवारी निखिल याचेवर अंतिम संस्कार केले व रात्री घोंगडे कुटुंबीयांसमवेत मृत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते. काल गुरुवारी पहाटे ४:३० च्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्रा शेड मधील लोखंडी अँगल ला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

दरम्यान घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाईक तिचा शोध घेत असताना तिने पत्रा शेडमध्ये तिने गळफास घेतल्याचे दिसून आले नातेवाईकांनी तिला खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

लग्नानंतर अवघ्या एक महिन्यात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू !

निखिलचा ५ डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. विवाह नंतर एक महिन्यातच अचानक निखिलचा ७ जानेवारी 2०२५ रोजी मृत्यू झाला. पती निखिलच्या मृत्यू मुळे विरह न झाल्याने पत्नी अनिता हीने गुरुवार ९ जानेवारी रोजी तिसऱ्याच्या विधी दिवशी गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवन संपवले.ती-पत्नीच्या एकापाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाच परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्खं गाव हळहळ व्यक्त करीत होते.

निखिल याची आत्या वंदना शिरसावडे (रा.मालगाव ता.मिरज जि सांगली) यांची मुलगी अनिता होती तर निखिल मामा दिगंबर घोंगडे यांचा मुलगा होता. अनिताला मामाच्या मुलाशी लग्न करायचे होते. त्यामुळे घरातील नातेसंबंधामुळे ५ डिसेंबर रोजी दोघांचा विवाह झाला होता आणि अवघ्या एकाच महिन्यात पती-पत्नीचा लग्नाला कोणाची दृष्ट लागली आणि दोघांचा थाटलेला राजसंसार अकस्मात मृत्यूमुळे मोडला.

Related Articles

Back to top button