maharashtrapoliticaltop news

नाना पटोलेंना डच्चू? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती जाणार? घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. मात्र दुसरीकडे महायुतीला मोठा फटका बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटानं 20, काँग्रेसनं 16 तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं केवळ 10 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, आता याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडकडून प्रदेशाध्य पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत.

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तात्काळ बोलावण्यात आलं आहे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसकडून याची दखल घेतण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 16 च जागा जिंकता आल्या, त्यानंतर आता काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. त्यांना हायकमांडकडून तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे, ते दिल्लीला रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button