crimemaharashtratop news

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे (Pune News) विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त (Fake Alcohol seized) केली आहे. या कारवाई एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती. नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. त एकूण 9 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button