Military Education : आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, काय आहे अपडेट

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Basic Military Education and Training : आता राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे बेसिक प्रशिक्षण असेल. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

Military Education from First Standard : राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे म्हणाले.

काय म्हणाले दादा भुसे?

” इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.” अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे ते म्हणाले.

सिंगापूर दौऱ्यातून संकल्पना

जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना नुकतेच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्र प्रथम ही संकल्पना आढळून आली. त्यामुळे हाच दुवा पकडत राज्यातही राष्ट्र प्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री भुसे यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी हेल्थकार्ड

विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली. इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे दादा भुसे म्हणाले.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon