crimemaharashtrapoliticalsolapurtop news

वर्षाच्या पहिल्या दिवशीच भाविकांचा भीषण अपघात; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर – सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सुविचार अन् नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात केली जात आहे. राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून शिर्डी साईबाब, शेगावच्या गजानन महाराज, पंढरीच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या (Akkalkot) स्वामी समर्थ चरणी नततमस्तक होण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. मात्र, अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील या भीषण अपघातात 4 भाविक जागीच ठार झाले असून इतर 7 जण जखमी आहेत. यातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
Oplus_16908288

अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना घडली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करुन गाणगापूरकडे जात असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमीना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आहे.

Related Articles

Back to top button