maharashtrapoliticalsolapurtop news

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

1 जानेवारी 2025 | बुधवार

  • पवार कुटुंबातील वाद लवकर संपू देत, अजितदादांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत, उपमुख्यमंत्र्यांच्या आई आशाताई पवार यांचे विठुरायाला साकडे

  • अजितदादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरी म्हणाले, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड अडथळा ठरतायेत

  • निष्ठावंत शिलेदार राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात चर्चेला उधाण

  • अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, देवेंद्र फडणवीसांसह रश्मी शुक्लांचं कौतुक, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या ‘बंडखोर’ भूमिकेची चर्चा

  • येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण

  • एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थगिती

  • नियोजन हुकले! बारावी CBSC आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी! विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

  • मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय

  • सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग

  • हॉर्न वाजवल्याने मंत्री गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ,जळगावमध्ये तुफान राडा; दुकानांची जाळपोळ

  • सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात

    अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी

  • इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने आई-वडिलांना संपवलं, नागपुरातील खळबळजनक घटना

  • अमेरिकेत नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांना ट्रकने चिरडले: 10 ठार, 30 हून अधिक जखमी; हल्लेखोराने गोळीबारही केला

  • वाल्मीक कराडची बंद खोलीत चौकशी: रात्री प्रकृती बिघडल्यामुळे आली होती ऑक्सिजन लावण्याची वेळ; CID अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी

  • महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपीला अटक: क्रीडा संकुलात केला 21 कोटींचा स्कॅम, दिल्लीतून पळून जाताना पोलिसांनी केली अटक

  • शरद पवारांसमोर लोटांगण घालून पाया पडणार: माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील, नरहरी झिरवाळ यांचे मोठे विधान

  • ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या कामगिरीवर गंभीर नाराज: म्हणाला- पुरे झाले, आता माझ्या योजनेनुसार खेळावे लागेल, नाहीतर धन्यवाद म्हटले जाईल

  • रोहित, बुमराह, अश्विन या भारतीय खेळाडूंनी 2024 ला दिला निरोप: शर्मा म्हणाला- 2024 मधील चढ-उतारासाठी धन्यवाद; बुमराहने पत्नीसोबत साजरे केले नववर्ष

  • माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज

  • जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल

 

HTML img Tag Simply Easy Learning    

सौजन्य –

✨ *हॉटेल जयनिला*✨

व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची एक नंबर कॉलिटी

♦️सांगोल मधील एकमेव हॉटेल ♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला.

मो.8007812004

Related Articles

Back to top button