जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, 200 विकेट घेत नोंदवला विक्रम
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडलं. बुमराहने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. 200 विकेट झटपट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेडची विकेट घेत त्याने 200वी विकेट साजरी केली. भारतासाठी 200 विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 200 विकेट वेगाने घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज कपिल देवच्या नावावर होता. 1983 मध्ये 50व्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध 200 वी विकेट पूर्ण केली होती.
जसप्रीत बुमराहने 200 वी विकेट घेत आपली सर्वोत्तम सरासरी ठेवली आहे. आतापर्यंत कसोटी अशी कामगिरी करणाऱ्या सर्व गोलंदाजांना मागे टाकले आहे. बुमराहने 19.5 च्या सरासरीने 200 विकेट घेतल्या आहेत. तर मॅल्कम मार्शलने 20.9, जोएल गार्नरने 21, तर कर्टली एम्ब्रोसने 21 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराहने कपिल देवच्या वेगवान 200 विकेटचा विक्रम मोडीत काढला आहे. बुमराहने 200 वी विकेट 44 व्या कसोटीत घेतली. सर्वात वेगवान 200 विकेट घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या यासिर शाहच्या नावावर आहे. त्याने 33 सामन्यात 200 विकेट घेतल्या आहेत.
बुमराहने मागच्या 16 डावात ट्रेव्हिस हेडला सहावेळा बाद केलं आहे. ट्रेव्हिस हेडने बुमराहच्या 220 चेंडूंचा सामना केला आणि 133 धावा केल्या. दरम्यान, आर अश्विनने 38 डावात भारतासाठी बुमराहपेक्षा वेगाने 200 बळी मिळवले आहेत, तर रवींद्र जडेजानेही 44 कसोटींमध्ये हा टप्पा गाठला आहे. जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये कसोटीत एबी डिव्हिलियर्सची पहिली विकेट घेतली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये हेडची विकेट घेत 200 विकेटचा पल्ला गाठला. (सर्व फोटो- बीसीसीआय)