india worldmaharashtrapoliticalsolapurtop news

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, श्रीकांत शिंदे दिल्लीवरुन अधिवेशन सोडून मुंबईकडे रवाना

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. मात्र, राज्यात नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांची भुमिका मांडणार आहे. थोड्याच वेळात दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. ते नेमकी काय भुमिका मांडणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

गेल्या तीन दिवसांसून राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 3 दिवसानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणत्या ऑफर आल्या, कोणत्या ऑफर नाकारल्या, मुख्यमंत्री पदाबाबत नाराजी की नाराजी दूर, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे थोड्याच वेळात मिळणार आहेत. दरम्यान, सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दिल्लीत होते. मात्र, ते तातडीनं दिल्लीहून अधिवेशन सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते देखील पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. ते प्रथमच पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. ते नेमकं काय बोलणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Back to top button