हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती पाणी पिणे आवश्यक? जाणून घ्या तज्ञांकडून पाणी पिण्याची योग्य पद्धत
आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे लोक त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे आपले शरीर काही आजारांना बळी पडते. अशा परिस्थितीत जर आपण सुरुवातीपासूनच आपल्या जीवनशैलीकडे योग्य लक्ष दिले तर आपल्या स्वतःला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतो. यासाठी आपल्या रोजच्या दिनचर्येत काही चांगल्या सवयींचा समावेश करणे आवश्यक आहे. यापैकी एक चांगली सवय म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिणे. अनेक जण सकाळी सर्वात आधी चहा किंवा कॉफी पितात आणि त्यानंतर पाणी पितात पण असे केल्याने तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. हे अनेकांना माहिती नाही. निरोगी जीवनशैलीसाठी सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी पिणे आवश्यक आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा सकाळी कोमट पाणी पिल्यास पोट आणि शरीर दोन्हीही निरोगी राहते.
दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करणे चांगले मानले जाते. मात्र हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळणे आवश्यक आहे. हिवाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे चांगले असते. यामुळे पचनक्रिया सुधारते. सकाळी पाणी पिल्याने शरीरात साचलेले टॉक्सिन्स निघून जातात आणि डिटॉक्सिफिकेशन होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याची सवय आपल्या दिनचर्येचा एक भाग करून घ्या.
हिवाळ्यात सकाळी किती ग्लास पाणी प्यावे?
हिवाळ्यात सकाळी किती ग्लास पाणी प्यावे याचे उत्तर देताना डॉक्टर किरण गुप्ता सांगतात की जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल तर तुम्ही रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊ शकता. पण जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा यकृताची संबंधित काही समस्या असेल तर तुम्ही एक किंवा दोन घोट पाणी पिण्यास हरकत नाही. प्रत्येक वेगळी प्रत्येक व्यक्तीच्या शरीर हे वेगळे असते त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार सकाळी उठून पाणी प्या.
जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर सकाळी किती पाणी प्यावे हे जाणून घेण्यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. याशिवाय डॉक्टर गुप्ता हे देखील सांगतात की तुम्ही सकाळी किती पाणी प्यावे हे तुम्ही रात्री काय जेवले आणि कोणत्या वेळेला जेवले यावर अवलंबून असते. जर तुम्ही रात्री उशिरा जेवण केले आणि तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर तुम्ही चार ते पाच ग्लासांपेक्षा जास्त पाणी पिऊ शकता. परंतु जर तुम्ही लवकर जेवला असाल तर एक ग्लास पाणी तुमच्यासाठी योग्य आहे.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
डॉक्टर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला ऍसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सकाळी किती पाणी प्यावे हे ठरवणे ज्याच्या त्याच्या शरीरावर अवलंबून असते. जर तुम्ही सकाळी थोडेसे पाणी प्यायले तरी ते तुमचे पचन सुधारेल. तसेच पाणी नेहमी बसून आणि हळूहळू प्यावे अचानकपणे पाणी पिणे टाळा.
सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. सकाळी लवकर पाणी पिल्याने दिवसभर उत्साही वाटते. हिवाळ्यात सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते. यामुळे शरीर आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. मन सक्रिय होते आणि शरीर डिटॉक्स होते. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने बद्धकोष्ठते पासून आराम मिळतो आणि पोट साफ होते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यासोबतच रक्तभिसरण ही सुधारते.