महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या 2000 पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रकरण उघड झाला आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेत 9 महिन्यांचे 13,500 रुपये लाटले आहेत. एकूण 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे.
कधी 1500 रुपयांवरून तर कधी 2100 रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार या मुद्यावरून.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते.गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती. त्याद्वारे लाभार्थी महिलाना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. मात्र सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही. अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेकांनी फसवून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले, अनेक तक्रारीदेखील आल्या. राज्यातील तब्बल 1 लाख 60 हजांरापेक्षा अधिक (महिला-पुरूष) कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले. याच पार्श्वभूमीवर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे उघड झाले असून या बातमीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
अनेकाकंडून शासकीय योजनांचा गैरफायदा घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाल तब्बल 1.50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा युआयडी ( Unique Identification Data) उपलब्ध करून देण्यात आला आणि त्याची पडताळणी करण्यात आली. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्यात आली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे चेक करण्यात आले असता 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेले, असे उघड झाले.
9 महिन्यांत प्रत्येकी लाटले 13 हजार 500 रुपये
गेल्या वर्षी, म्हणजेच ऑगस्ट 2025 ते एप्रिल 2025 म्हणजेच एकूण 9 महिन्याचे मिळून 13 हजार 500 रुपये त्या महिलांनी लाटले. एकूण हा आकडा 3 कोटींपेक्षा जास्त होत आहे. लाडकी बहीण योजना ही गरीब , महिलांसाठी असून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नसल्याचे, आधीच नियमांत स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र तरीही सरकारी कर्मचारी महिलांचा पैशांचा मोह काही सुटला नाही आणि त्यांनी या योजनेसाठी अर््ज भरत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांवर डल्ला मारलाय. हे प्रकरण उघडकीस आल्यावर खळबळ माजली असून आता आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाणार असल्याचे समजते.
संबंधित बातम्या





लाखो महिलांकडून दोन योजनांचा लाभ
एवढंच नव्हे तर 8 लाखांहून अधिक महिलांनी दोन सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 लाख 85 हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलला आहे. सरकारी कर्मचारी म्हणून गलेलठ्ठ पगार मिळत असूनही त्यांनी दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाटलेच पण त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी 6 हजार, ( म्हणजेच एकूण 12 हजार) रुपयेही त्यांनी घेतल्याच समोर आले आहे.
लाडक्या बहिणी बनत आता ज्या 2 हजार 652 महिलांनी दर महिन्याचे 1500 रुपये लाटले आहेत, त्यांच्या एकूण 3 कोटी 58 लाख रुपयांची शासनाकडून वसुली करण्यात येणार असल्याचे समजते.