politicalmaharashtrasolapur

निवडणुकीपुरतेच भाळवणी गट आठवणाऱ्यांना आम्ही योग्य जागा दाखवू; भाळवणीकरांचा लोकप्रतिनिधींवर संताप

भाळवणी गटात शेकापच्या कॉर्नर सभेला मोठी गर्दी

सांगोला: विधानसभा निवडणुकीमुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी भाळवणी गटात कॉर्नर सभा संपन्न झाल्या. कॉर्नर सभेला भाळवणी गटातील सर्व गावांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. गावोगावी नागरिकांनी डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख  यांचे जोरदार स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण करत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विजयाचा विश्वास दिला. तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा उत्स्फूर्त असा सहभाग कॉर्नर सभेत पाहायला मिळाला.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटात डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये महिला, भगिनी, मुले, ज्येष्ठ नागरिक, तरुण हे आतुरतेने थांबत असल्याचे चित्र दिसून आले. यावे महाविकास आघाडी व  मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत मागील तीन वर्षांमध्ये केलेल्या समाजसेवेची ही पोच पावती असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. स्व.आबासाहेब यांचे  स्टेटस ठेवू नका,  पोस्ट टाकू नका अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेल्या स्व.आबासाहेब व देशमुख कुटुंबाला तुम्ही कसा बाहेर काढणार?मायबाप जनतेला धमक्या देऊन नाही तर प्रेमाने आत्मसात करत त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम करणारा लोकप्रतिनिधी हवाय म्हणून सर्व सामान्य जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

भाळवणी गटातील प्रत्येक गावात ओन्ली डॉक्टर बाबासाहेब देशमुख असे नागरिक ठणकावून सांगत आहेत.इतर उमेदवारांना आम्ही या निवडणुकीत त्यांची जागा योग्य पद्धतीने दाखविणार आहोत.ही लढाई भ्रष्टपरिवार, गद्दार विरुध्द सामान्य निष्ठावान आपला माणूस  यांच्यात होत आहे.  गेल्या पाच वर्षात आम्हाला लोकप्रतिनिधींकडून मोठा त्रास सहन करावा लागला आहे प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून सांगोला मतदार संघाचे नाव धुळीस मिळवले आहे. गुंडगिरी भ्रष्टाचार मुक्त मतदार संघ करण्यासाठी आम्ही डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. टक्केवारी मागणाऱ्याना मत मागण्याचा अधिकार नसून निवडणुकीपुरते भाळवणी गट आठवणाऱ्यांना आम्ही योग्य जागा दाखविणार असल्याचे प्रत्येक गावातील ग्रामस्थ संतापाने सांगत आहेत.

Related Articles

Back to top button