politicalmaharashtra

बारामतीसारखा सांगोला तालुका करून दाखवतो – आम. शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्यातील तिपेहाळी, किडे बिसरी,पाचेगाव‌ बुद्रुक,गौडवाडी, करांडेवाडी, सोमेवाडी, कमलापूर, या .मंगेवाडी ,सोनलवाडी, वाटंबरे येथे प्रचार सभेदरम्यान युवक कार्यकर्त्यांचा शेकडोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश

 

सांगोला-

महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात महाराष्ट्रात विकासाभिमुख कामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी‌ आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी देऊन तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रेरित केले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला विकासासाठी निधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. सर्वच विभागासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी या निधीतून अनेक प्रकारची महत्त्वपूर्ण विकास कामे पार पाडली. आमदार शहाजीबापू पाटील यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख निर्माण झाली. बारामती सारखा सांगोला तालुका करून दाखवतो असा ठाम विश्वास आम. शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील वाटंबरे येथे प्रचारादरम्यान व्यक्त केला.

सांगोला तालुक्यातील तिपेहाळी, किडे बिसरी, पाचेगाव बुद्रुक, गौडवाडी, बुद्धेहाळ, सोमेवाडी, कमलापूर, य.मंगेवाडी सोनलवाडी ,वाटंबरे या गावात गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या प्रचारातील कॉर्नर सभेदरम्यान आम. शहाजीबापू पाटील हे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले,अखेरच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या सेवेमध्येच राहणार असून ही निवडणूक अटीतटीची असल्याने मतदारांनी गाफील राहू नये. प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन आम. शहाजीबापू पाटील यांनी प्रचार सभेदरम्यान केले .

यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते संभाजीतात्या आमदार , किसान सेलचेनेते शिवाजी अण्णा गायकवाड‌,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, संदीप मोहिते ,मच्छिंद्र मोहिते, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, चेअरमन बंडू तंडे ,पप्पू ऐवळे, दादा खरात ,माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, सचिन पवार ,सूर्यकांत पवार, दत्ता पवार ,प्रवीण घोडके , ॲड. महादेव कांबळे, दीपक ऐवळे, विजय बनसोडे, सचिन पवार, सूर्यकांत पवार, दत्ता पवार यांनी आपल्या मनोगत सांगितले की, तालुक्यात कामाचा आम. म्हणून शहाजीबापूंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल .जागृकपणे मतदान प्रक्रियेला सामोरे जाऊया .तरुणांना यापुढे नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही. आम. शहाजीबापू पाटील हे तालुक्यात मोठी एमआयडीसी आणून तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार आहेत. तालुक्यातील लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला मतदान रुपाने दान द्यावे. तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास शहाजीबापू पाटील हेच करणार आहेत. तसेच कोरडा व माण नदीला कालव्याचा दर्जा दिला आहे. शेतीच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने हा प्रश्न सोडवण्यात शहाजी बापूंना मोठे यश आले आहे .तालुक्यात रस्ते, समाज मंदिरे ,धार्मिक स्थळे, व विकासकामावरती मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला.खऱ्या अर्थाने शिवाजीबापू पाटील यांच्याकडे तालुक्याविषयी आत्मीयता असून त्यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर ,सोपान नरळे, वसंत पाटील ,मच्छिंद्र मोहिते, भगवान देशमुख , शिवसेनेचे नेते शिवाजी घेरडे, सरपंच शोभा घागरे ,दगडू चौगुले, रामा मलमे अरविंद घेरडे ,मारुती घागरे ,माणिक ढेंबरे, युवराज घोडके, साहेबराव घोडके, मंगेश आदलिंगे ,रमेश वाघमारे ,प्रकाश सोळसे, अमोल पाटील , दत्तात्रय मासाळ प्रताप येलपले, बाळाप्पा येलपले ,भाजपचे दिलीप सावंत, उपसरपंच पोपट यादव, ग्रा.प. सदस्य दिनेश बाबर, सूर्यकांत पवार सर, मधुकर पवार, खंडू पवार, आप्पासाहेब शिंदे, नानाबापू पवार, गंगाराम चौगुले, बाळासाहेब बाबर आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी तालुक्यातील सोमेवाडी व कमलापूर येथे शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आम. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Back to top button