उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार-आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला/ प्रतिनिधी– माझ्या पाच वर्षाच्या काळात 5 हजार कोटीहून अधिक निधी आणला. मतदारांनी मी केलेल्या विकास कामांची शहानिशा करावी. मला विरोध करायचा म्हणून दोन उमेदवार विरोधात निवडणूक लढवत आहेत . महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे . पाच वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील सर्वच समाजातील सर्व घटकांना न्याय दिला . तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. माझ्या जीवनातील ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.तालुक्यातील उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोनंद येथील प्रचार सभेदरम्यान केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोणविरे, हणमंतगाव, निजामपूर ,मानेगाव ,डोंगरगाव, गळवेवाडी, सोनंद या गावात बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी प्रचारानिमित्त कॉर्नर सभा घेण्यात आल्या. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले,उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासाची व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात एमआयडीसी आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे . मला पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, उद्याची विधानसभा निवडणूक ही निर्णायक व अटीतटीची असून राजकीय दृष्ट्या चर्चेत असणारी आहे.
यावेळी भाजपचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीअण्णा गायकवाड,सांगोला विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, भाजपचे माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार , भाजपच्या कार्यकारणी सदस्या राजश्री नागणे पाटील, ॲड. बंडू काशीद, विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे, ज्येष्ठनेते जगदीश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे, भीमशक्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे,आदींनी आपल्या मनोगतात सांगितले की, सांगोला तालुक्यात टेंभू, म्हैसाळ,निरा उजवा कालवा, उजणी, जिहे कट्टापुरचं पाणी मंजूर करून घेतले. शहरातील सर्व कार्यालये एकत्र असावीत म्हणून शहरात तीन मजली प्रशासकीय इमारतीचे काम चालू आहे .ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा दिला, रेस्ट हाऊसचे काम पूर्ण केले.भव्य ईदगाह मैदान उभे केले. सांगोला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी दिला. पाच वर्षात सांगोला तालुक्यात केलेली विकास कामे पुस्तकाच्या रूपाने जनतेसमोर ठेवली आहेत. विकास कामाला न्याय देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिकाने विजयी करावे .आमदार शहाजीबापू पाटील नुसते आमदार होणार नाहीत तर ते नामदार म्हणून तालुक्यामध्ये येतील. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
यावेळी डोंगरगाव येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आम. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. प्रचार सभेसाठी माजी सभापती विलास काशीद,भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांतभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर , सरपंच ताई बाबर ,बाबुराव शिंदे, चंद्रकांत काशीद, विश्वनाथ पाटील, बाळासाहेब शिंदे, दादासो बाबर ,बंडू बाबर, यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.