झंझावाती शरद पवार ! 10 दिवसांत घेणार 36 सभा; सांगोल्यात होणार का नाही ?
शेवटच्या सभेसाठी निवडलं खास ठिकाण;
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील प्रमुख नेते एका दिवशी चार-चार सभांना संबोधित करत आहेत. काही नेतेमंडळींच्या पुढच्या सभांचे नियोजनही आतापासूनच चालू आहे. आगामी काही काळात या नेतेमंडळीचां कार्यक्रम निश्चित झालेला आहे. यामध्ये खासदार शरद पवार हेदेखील मागे राहिलेले नाहीत. शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या शेवटच्या सभेचं ठिकाणही विशेष असणार आहे.
शरद पवार 10 दिवसांत घेणार 36 सभा
आगामी काळात शरद पवार पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. ते पुढच्या दहा दिवसांत म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 36 सभांना संबोधित करणार आहेत. यामध्ये उत्तर कराड, तासगाव कवठे महांकाळ, इंदापूर, कर्जत जामखेड अशा महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. या सभांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत शरद पवारांच्या एकूण 50 सभांचे आयोजन होणार आहे.
शरद पवार आज (नोव्हेंबर) उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत.
10 नोव्हेंबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी
11 नोव्हेंबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
12 नोव्हेंबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव
13 नोव्हेंबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी
14 नोव्हेंबर- चिंचवड/पिंपरी रॅली
15 नोव्हेंबर- तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर
16 नोव्हेंबर- वाई, कोरेगाव, माण, फलटण
17 नोव्हेंबर- करमाळा, माढा, कर्जत जामखेड
18 नोव्हेंबर- भोर, दौंड, इंदापूर, बारामती
शेवटची सभा बारामतीमध्ये
शरद पवार यांची शेवटची सभा 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे ही शेवटची सभा बारामती या मतदारसंघात होणार आहे. या मतदारंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार आणि खुद्द अजित पवार यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे शेवटच्या सभेसाठी शरद पवार यांनी बारामती हा मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे अजित पवार यांचं टेन्शन वाढणार आहे.