सांगोला: सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकोप्याने विचार विनिमय करून निर्णय घेतात. सर्व कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असल्यामुळे पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सांगोला तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत लाल बावटा फडकवण्याचा संकल्प महुद बु येथील शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महुद बु येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनिता संजय कोळेकर व संजय नारायण कोळेकर यांनी शिंदे गटातून असंख्य कार्यकर्त्यासह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना महुद भागातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी जपलेले व रुजवलेले पुरोगामी विचार प्रत्यक्षात लोकांच्या मनामनात पोहोचवणारा शेतकरी कामगार पक्ष हा सत्य आणि वास्तव आहे. सर्व सामान्य नागरिक यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पाठीशी आजही तेवढ्याच ताकतीनिशी सोबत असल्याचे दिसून येते. सांगोला तालुक्यात सर्व समाजात लोकप्रिय असणाऱ्या व सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली असून शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा या तालुक्यावर पुन्हा फडकविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक शिट्टी चिन्हं बहाल करण्यात आले असून सांगोला तालुक्यात शिट्टीचा आवाज घुमू लागला आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध नागरिकांकडे शिट्टी दिसून येत असून शिट्टीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमू लागला आहे.