Friday, October 18, 2024
Homemaharashtraसांगोला येथे युवा महाराष्ट्र युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल  रॅलीचे व बैठकीचे...

सांगोला येथे युवा महाराष्ट्र युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल  रॅलीचे व बैठकीचे गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी आयोजन

सांगोला/ प्रतिनिधी:  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्यासाठी 5 हजार 500 कोटी रुपये निधी देऊन सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे. या निधीतून आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. सांगोला तालुक्यात युवक संघटन व युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगोला येथे गुरुवार दि. 17 ऑक्टोबर रोजी 11 ते 4 या वेळेत युवा महाराष्ट्र ,युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोटर सायकल रॅली तसेच सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बैठक आयोजित केली आहे. या मोटरसायकल रॅली दरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून ही रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे जाणार असून तेथे बैठक आयोजित केली आहे.
सांगोला शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पंडित जवाहरलाल नेहरू ,छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बैठकीसाठी मार्गस्थ होणार आहे. या रॅलीसाठी व बैठकीसाठी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश परीषा प्रताप सरनाईक, युवासेना सचिव किरण माळी, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार शहाजीबापू पाटील हे भूषविणार आहेत. अशी माहिती युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांनी दिली आहे.
            युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख ,शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे ,विधानसभा संपर्कप्रमुख अभिजीत नलवडे, युवा नेते दिग्विजयदादा पाटील , ओबीसी सेल जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे, जिल्हा प्रमुख जगदीश पाटील, युवासेना जिल्हा उपप्रमुख नानासाहेब मोरे, तालुकाप्रमुख दीपक (गुंडादादा) खटकाळे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख राणीताई माने, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख छायाताई मेटकरी, शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली, युवासेना शहरप्रमुख समीर पाटील , शिवसेना शहरप्रमुख एस.सी सेलचे कीर्तीपाल बनसोडे, शिवसेना ओबीसी सेलचे शहरप्रमुख आयुब मुलाणी, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख प्रतिश दिघे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर ,मागासवर्गीय सेलचे दीपक ऐवळे, प्रसिद्धी प्रमुख छोटु दौंड हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांनी केले आहे .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments