मोठी बातमी! शिंदे अपात्र झाल्यास काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला. शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रतेच्या मुद्यावर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र होऊच शकत नाहीत.
कारण तेवढा आम्ही कायद्याचा अभ्यास केला असून ते कोणत्याही परिस्थिती अपात्र होऊच शकत नाही, असे सांगत त्यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दलही एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली. शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे कोणत्याही मुद्यावर मतभेद नसून आम्ही चांगल्या पद्धतीने सरकार चालवत असून आम्ही एकमेकांसोबत कंपर्टेबल आहोत.
राज्यातील सरकार स्थिर आणि राजकीय शक्ती वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आमच्या सरकारची शक्ती वाढवण्यासाठी अजितदादा यांना विचारुनच आम्ही सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही ते केले आहे. तसेच शिंदे हे आपला कार्यकाळ पूर्ण करणार असून आगामी काळातील निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.