entertainment

एकदम ‘झकास’ | डिव्हिलियर्सने केले ‘कांतारा’चे कौतुक

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटमध्ये मिस्टर 360 डिग्री म्हणून परिचीत असलेल्या ए. बी. डिव्हिलियर्स याने ‘कांतारा’चे कौतुक केले आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी यानेडिव्हिलियर्सची भेट घेतली. 

या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. आपापल्या क्षेत्रातील दिग्गज असलेल्या या सेलिब्रिटींनी काही वेळ एकत्र घालवला. या व्हिडिओमध्ये डिव्हिलियर्स हा ‘कांतारा’ हे चित्रपटाचे नाव मोठ्या उत्साहाने उच्चारताना दिसतो. यामुळे या चित्रपटाच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यात ऋषभने म्हटले आहे की, इट्स अ मॅच! मेट द रियल 360 टुडे. द सुपरहिरो इज बॅक टु द रूट्स अगेन टु नम्मा बेंगलुरू…
यापुर्वी अनिल कुंबळे, प्रभास, प्रशांत नील, विवेक रंजन अग्निहोत्री, रजनीकांत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी हा चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले आहे. आयएमडीबीने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या सध्याच्या टॉप 250 भारतीय चित्रपटांमध्ये हा चित्रपट अव्वल स्थानी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button