entertainment
वेड चित्रपटाने मोडला ‘सैराटचा’ रेकॉर्ड

रितेश देशमुखचा वेड हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे, असेच म्हणावे लागेल. करण कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने सैराटचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटातील रितेशच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. दुसऱ्या आठवड्यात ही या चित्रपटाची क्रेझ पाहावयास मिळत आहे.
पहिल्या आठवड्यात सैराट या चित्रपटाने बारा कोटींची कमाई केली होती. त्या खालोखाल या चित्रपटाने अकरा कोटींची कमाई केली. तर नटसम्राट या चित्रपटाने दहा कोटींची कमाई केली होती. सर्वांवर बाजी मारत वेड या चित्रपटाने मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 33 कोटींची कमाई केली आहे.