india worldmaharashtrapolitical

भाजपमध्ये गेलो असतो तर मंत्री झालो असतो, तसं न केल्याने मला जेलमध्ये टाकलं; अनिल देशमुखांचा भाजपवर घणाघात

नागपूर: राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100% खरी आहे. त्यात सत्यता आहे, कारण ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सरकारमध्ये सामील व्हावं लागलं, याची सर्वांना कल्पना आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेबांवर ही दबाव होता, ते जेल मधून बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की पुन्हा एकदा सर्व चौकशीला सामोरे जायचं आणि पुन्हा जेलमध्ये जायचं. म्हणून या सर्व लोकांनी भाजपच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतेला. असा घणाघाती आरोप राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.

…. तर आज मी मंत्री झालो असतो

अशाच पद्धतीचा दबाव माझ्यावरही होता. मात्र मी फडणवीस यांना सांगितलं होतं की मी तुमच्या दबावाला मानणार नाही. तुम्ही वाटल्यास ईडी सीबीआय लाऊन मला जेलमध्ये टाका. मात्र, उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधीही तुम्ही पाठवलेल्या एफीडेव्हिट वर स्वाक्षरी करणार नाही आणि जसं मी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आणि ईडीचे पथक आले. मी पण यांच्याप्रमाणे बीजेपी बरोबर गेलो असतो, तर आज मी मंत्री झालो असतो. मात्र मला यांच्यासोबत जायचं नव्हतं, म्हणून मला जेलमध्ये टाकलं. असेही अनिल देशमुख म्हणाले. राष्ट्रवादी मधील अनेकांवर ईडी, सीबीआयचा दबाव भाजप आणि फडणवीस आणि टाकलं होता. तसेच दिल्लीच्या दबावाखाली हे सर्व चालू होतं, असा आरोपही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.

पुस्तक लिहिणारे राजदीप सरदेसाई काय म्हणाले?

जे पुस्तक आहे, लोकांनी ते पुस्तक वाचावं. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात काय घटनाक्रम घडले, त्याचं स्पष्टीकरण या आहे. छगन भुजबळ यांनी ही स्पष्टीकरण दिलेल आहे. जनतेने पुस्तक वाचायला पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर त्यांना विचारा… राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार लेखक म्हणून जी वस्तूस्थिती आहे, ती लिहली, असं राजदीप सरदेसाई यांनी सांगितले. छगन भुजबळ माझ्यासोबत बोलत असताना अनेक लोक त्यावेळी सोबत होते. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. हे राजकारणाचे प्रश्न आहे. राजकारण ज्यांना करायचा त्यांना करू द्या मी त्यात पडणार नाही. या पुस्तकात एक चॅप्टर महाराष्ट्रावर आहे. हे पुस्तक महाराष्ट्रावर नाही. मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यावर काही म्हणायचं नाही हे पुस्तक वाचा. त्यात कुठल्याही पक्षाचा काही नाही.. ज्या ज्या लोकांचं मत होतं.. हे मत इथे मांडलेला आहे. छगन भुजबळ यासह अनेक विषयावर बोलले. पुस्तकाचा एक पॅरेग्राफ घेऊ नका. एका पॅरेग्राफवर राजकारण होतं. पूर्ण पुस्तक वाचा. पुस्तकांचा टाइमिंग काहीच नाही. 2014, 2019 आणि 2024 मी नोव्हेंबर महिन्यात पुस्तक लिहिलेले आहे. याचा आणि निवडणुकीचा टाइमिंगच्या काहीही संबंध नाही, असंही राजदीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Back to top button