शिंदेंच्या उमेदवाराच्या सभेसाठी आकडे टाकले, वीज चोरीचा व्हिडीओ व्हायरल
नांदेड : नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे यांच्या पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचाराचा नारळ आज (दि.3) मरळक तेथे फुटला. मात्र ठिकाणी आयोजित प्रचार सभेसाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याणकर यांच्या प्रचार सभेसाठी विद्युत खांबावरुन आकडे टाकून वीज घेण्यात आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन समाज माध्यमांवर वेग वेगळ्या चर्चा रंगल्या.
नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी आज (दि.3) प्रचाराचा नारळ फोडला. मात्र त्या ठिकाणी आयोजित प्रचार सभेसाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. कल्याणकर यांच्या प्रचार सभेसाठी विद्युत खांबावरुन आकडे टाकून वीज घेण्यात आल्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. “हे तर चोरच आहेत हे त्यांनी देवाच्या दारात सिद्ध करून दाखवले. या चोरांनी आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. पक्ष चिन्ह चोरल्यानंतर आता यांनी लाईट सुद्धा चोरलेली आहे . महादेवाच्या मंदिरात कधी चोरी लपत नसल्याची प्रतिक्रिया नांदेड उत्तरचे शिवसैनिकांनी दिली आहे.