पक्ष स्थापनेपासून सोबत असलेला राज ठाकरेंचा शिलेदार एकनाथ शिंदेंच्या गळाला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता पर्यंत शिवसेनेचे आमदार, खासदार, सचिव , गटप्रमुख, आणि अन्य कार्यकर्ते हे शिवसेनेचे फोडले होते. मात्रा आता बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे मोठे नेतेही प्रवेश करत आहेत. आगामी विधानससभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले मनसेचा शिलेदारउमेश गोवारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश केला.
उमेश गोवारी हे राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून मनसेसोबत होते. डहाणू तालुकाप्रमुख आणि 2019 चे पालघर विधानसभेचे मनसेचे उमेदवार उमेश गोवारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. 2019 चे विधानसभा निवडणुकीत पालघर विधानसभेत उमेश गोवारी पंधरा हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज होते. उमेश गोवारी यांच्यासह डहाणू आणि तलासरीतील आठ ते दहा पदाधिकारी आणि बारापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांच्या हाती धनुष्यबाण घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश केला.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडांना उमेदवारी जाहीर
मनसेनं आत्तापर्यंत 70 उमेदवारांची नावे जाहीर केली असून जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बुधवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मनसे कडून पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस – शिवसेना – काँग्रेस असा प्रवास करणारे माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांनी अनेक वर्ष काँग्रेसशी असणाऱ्या पारिवारिक संबंधाला सोडून नुकताच मनसेमध्ये पक्ष प्रवेश केला होता. सचिन शिंगडा यांनी उमेदवारी मिळेल या आशेने मनसेची धरली. त्यानंतर आता मनसेकडून त्यांना विक्रमगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.