जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडा, राज्य सरकारचे आदेश
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेल्या पत्रात कोणतंही तथ्य नाही. मराठवाड्याला हक्काचं पाणी सोडण्यास कोणताही गतिरोध नाही. सरकार सुप्रीम कोर्टाच्या आंदोलनाचं तंतोतंत पालन करणार आहे. मराठा आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेला तर अजिबात अडसर नाही. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पत्रातील सत्यता तपासणार, अशी सरकारची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका पत्राचा फोटो ट्विट केलाय. जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा उगाच संबंध जोडला जात असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. त्यांनी अधीक्षक अभियंताचं पत्र ट्विट केलंय. या पत्रात मराठा आंदोलनाचा आणि जायकवाडी पाणी प्रश्नाचा संबंध जोडण्यात आल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.