दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन 36 प्रवासी जबर जखमी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. या अपघातातील 5 जण अंत्यवस्थ असून लातूर जिल्ह्यातील नांदगाव पाटीजवळ हा अपघात झाला.
1/7

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन 36 प्रवासी जबर जखमी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. या अपघातातील 5 जण अंत्यवस्थ असून लातूर जिल्ह्यातील नांदगाव पाटीजवळ हा अपघात झाला.
2/7

नांदेडहून लातूरकडे येणारी बस नांदगाव पाटीजवळ पलटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या रस्त्यावर मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाली.
3/7

एसटी बसचा हा अपघात अतिशय भीषण होता, या भीषण अपघातात बसमधील 48 प्रवाशांपैकी 36 प्रवाशांना जबर मार लागा आहे. त्यापैकी, 6 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
4/7

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तर स्थानिकही मदतीसाठी धावले. जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.
5/7

अपघातामधील जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, अपघाताबाबत नातेवाईकांना व कुटुबीयांना फोनवरुन माहिती देण्यात आली आहे.
6/7

अपघातामध्ये 3 ते 4 प्रवाशांचे हात कोपऱ्यापासून किंवा खांद्यापासून तुटल्याचे पाहायला मिळत आहे, त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. अपघातात जबर जखमी झालेल्या 36 जणांपैकी सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे.
7/7

दरम्यान, पोलीस व जिल्हा प्रशासनाने अपघाताची दखल घेत मदत व बचावकार्य सुरू केले असून महामार्गावरच हा अपघात झाल्याने स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा