Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: सरकारकडून ‘लाडक्या बहिणीं’ना मोठं गिफ्ट, ‘या’ दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी-मार्चचे पैसे…, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या…
राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. लडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार हे सांगितलं आहे. शिवाय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजणेतून 80 लाख महिला वगळल्या जाणार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे… यावर देखील अदिती तटकरे मोठं वक्तव्य करत योजना विरोधकांना खुपतेय असं म्हणाल्या आहेत.
लाडक्या बहिणींना कधी मिळणार फेब्रुवारी-मार्चचे पैसे?
8 मार्च रोजी शनिवार असून देखील सर्व महिलां लोकप्रनिधींसाठी आणि महिलांसाठी देखील सभागृहात विशेष सत्र होणार असल्याची माहिती देत मंत्री अदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल देखील मोठी घोषणा केली. शिवाय ‘लाडक्या बहिणींना’ फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.
अदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता 8 मार्च महिला दिनच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या खात्यात जमा होईल. साधारण 5 – 6 मार्च पासून संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे 8 मार्च रोजी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत.
80 लाख महिला वगळल्या जाणार आहेत असा विरोधकांचा आरोप…
यावर अदिती तटकरे म्हणाल्या, ‘विरोधक सुरुवातीपासून आरोप करतच आहेत. आम्ही जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा दोन कोटींपेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेऊ शकल्या आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थी महिला आहे, त्या त्याच प्रमाणे राहतील. योजना जाहीर झाल्यापासून ही योजना विरोधकांना खुपत आहे आणि गेल्या 5 – 6 महिन्यांपासून ज्या प्रकारे महिलांचा प्रतिसाद मिळत आहे, तो पाहिल्यानंतर विरोधकांमध्ये नैराश्य निर्माण झालं आहे. तेच नैराश्य विरोधक बहिणींमध्ये पसरवता दिसत आहे. पण महायुतीचं सरकार सक्षम आहे.’
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं महायुतीचं सरकार यापुढे देखील ‘लाडकी बहीण योजना’ अशाच प्रकारे सक्षमपणे कार्यरत ठेवणार आहोत… असं देखील अदिती तटकरे म्हणाल्या.