टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर

Gold Price Today 28 May 2026 Gold-Silver Rate Today: भू-राजकीय घडामोडींचा सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या बाजारातील व्यापार वातावरणावर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,461.02 डॉलर्स आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याचे दर वाचले का ?

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर

अधिकमासात सोनं आणि चांदीने गुड न्यूज दिली आहे. देशभरात सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली आहे. 28 मे रोजी सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात घट झाली. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,430 रुपयांपर्यंत घसरला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,280 रुपये इतका आहे. एक दिवसापूर्वी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1100 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,61,300 रुपये झाला. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याचा तणाव आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरची वाढती मागणी यामुळे गुंतवणूकदार सोन्याबाबत सावध झाले आहेत. दक्षिण इराणमध्ये अमेरिकेने केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून डॉलरची मागणी वाढली आहे.

अमेरिका-इराणमधील वाटाघाटींवर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. नजीकच्या काळात त्यांच्यात करार होण्याची आशा मावळत असून, वाढती ऊर्जा किंमत आणि जागतिक व्यापारात संभाव्य व्यत्ययांविषयी चिंता वाढली आहे. यामुळे महागाई दीर्घकाळ वाढतीच राहू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह, आपले कठोर चलनविषयक धोरण दीर्घ काळासाठी सुरू ठेवण्याची शक्यता आहे. हा सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी एक नकारात्मक घटक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,461.02 डॉलर्स इतका आहे.

देशांतील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

शहर 22 कॅरेट सोन्याचे भाव (₹) 24 कॅरेट सोन्याचे भाव (₹)
दिल्ली 145240 158430
मुंबई 145090 158280
अहमदाबाद 145140 158330
चेन्नई 146490 159810
कोलकाता 145090 158280
हैदराबाद 145090 158280
जयपुर 145240 158430
भोपाळ 145140 158330
लखनऊ 145240 158430
चंदीगड 145240 158430

चांदीच्या किमतीचे काय अपडेट्स ?

सोन्याप्रमाणेच चांदी या दुसऱ्या मौल्यवान धातूच्या दरातही आणखी घसरण झाली आहे. 28 मे रोजी सकाळी चांदीचा भाव 2,84,900 रुपये प्रति किलोग्राम होता. आदल्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 3300 रुपयांनी घसरून 2,69,700 रुपये प्रति किलोग्राम झाला होता. दरम्यान या वर्षी जानेवारी महिन्यात, भारतात चांदीच्या किमतीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता, मात्र आता चांदीे दर परत खाली आले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीची किंमत सध्या प्रति औंस 74.96 डॉलर इतकी आहे. भू-राजकीय घडामोडींचा परिणाम सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या बाजारातील व्यापार वातावरणावर होत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी

सांगोल्याचा पुढील आमदार शहाजीबापू पाटीलच होणार; स्थानिक निवडणुकांच्या बेरजेनुसार शिवसेनेचे पारडे जड: उदय सामंत

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

Dharashiv Adhik Mahina Gift: लाडक्या जावयाला सासऱ्याची अनोखी भेट, ‘सरप्राईज पार्सल’ सांगून पाठवली सुंदर घोडी, धोंडे जेवणाचा ‘तो’ किस्सा राज्यभर चर्चेत