टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

On: May 28, 2026 12:53 PM
Follow Us:

US Attack Iran : अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराच्या वाटाघाटी सकारात्मक दिशेने सुरु असल्याच्या बातम्या येत असतानाच एक वाईट बातमी आहे. अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केला आहे. तीन दिवसातील हा दुसरा मोठा हल्ला आहे.

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

US Iran War Updates : अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराच्या वाटाघाटी सकारात्मक दिशेने सुरु असतानाच पुन्हा एकदा युद्ध भडकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामुळे आधीच कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्यामुळे जग हैराण आहे. महागाई वाढत चालली असून भारतासह जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबून दोन्ही देशांमध्ये कधी शांतता करार होणार? याकडे सगळ्या जगाचे डोळे लागले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटीमध्ये चांगली प्रगती होत असल्याच्या बातम्या येत असतानाच अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने इराणवर पुन्हा एकदा नव्याने हल्ला केला आहे. तीन दिवसातील अमेरिकेने इराणवर केलेला हा दुसरा हल्ला आहे.

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या आसपासच्या ठिकाणावर हा हल्ला केलाय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये ज्या जागेवरुन अमेरिकन सैन्य आणि व्यापारी जहाजांना धोका निर्माण केला जात होता, तिथे हा हल्ला केलाय. अमेरिकेने चार इराणी ड्रोन्स सुद्धा पाडले. रिपोर्टनुसार अमेरिकी सैन्याने अब्बास बंदरात असलेल्या इराणच्या एका ग्राऊंड स्टेशनवर सुद्धा हल्ला केला. तिथून पाचवं ड्रोन उड्डाणाच्या तयारीत होतं.

अमेरिकन सैन्याने इराणच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं. अमेरिकी अधिकाऱ्याने न्यूज एजन्सी रॉयटर्सला अमेरिकन सैन्याने इराणवर नवीन हल्ले केल्याची माहिती दिली.

तीन स्फोटाचे आवाज ऐकू आले

या हल्ल्यानंतरही सीजफायर मोडलेलं नाही हे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं. ही कारवाई मर्यादीत आणि पूर्णपणे स्वत:च्या बचावासाठी केल्याचा अमेरिकन अधिकाऱ्याचा दावा आहे. अब्बास बंदर आणि हॉर्मुज स्ट्रेटमध्ये तीन स्फोटाचे आवाज ऐकू आले असं वृत्त इराणची अधिकृत न्यूज एजन्सी फार्सने दिलं होतं. स्फोटांची माहिती रात्री 1.30 च्या सुमारास मिळाली. त्यामुळे अब्बास बंदरातील एअर डिफेन्स प्रणाली एक्टिव करावी लागली असं IRGC शी संबंधित मिडिया आऊटलेट फार्सने वृत्त दिलं आहे.

मी अजूनही समाधानी नाही

“इराणसोबत कराराच्या ज्या अटी आहेत, त्यावर मी अजूनही समाधानी नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्यासाठी इराणचा करार करण्याचा कितीही इरादा असला तरी अजून मी त्यासाठी तयार नाही” असं ट्रम्प म्हणाले. करार झाला नाही, तर पुन्हा युद्ध सुरु होईल असा इशारा ट्रम्प यांनी आधीच दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now