टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL चं मैदान गाजवणाऱ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं घर कसं आहे? पाहा Inside Photos

Vaibhav Sooryavanshi Hose Inside Photos : आयपीएल 2026 मध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादवर 47 धावांनी विजय मिळवला. यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीची खेळी अतिशय प्रभावी ठरली. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने 29 बॉलमध्ये 97 धावा केल्या. त्याने यासह ख्रिस गेल डेव्हिड वॉर्नर आणि सनथ जयसूर्या या सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड मोडले. तेव्हा आयपीएलचं मैदान गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचं घर कसं आहे याविषयी जाणून घेऊयात.

vaibhav sooryavanshi house inside photos
1/8

 

१४ व्या वर्षी फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून 2025 मध्ये पदार्पण केलं. तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. वैभवने पहिल्याच सीजनमध्ये वेगवान शतक ठोकले आणि त्यासह अनेक रेकॉर्ड नावे केले.

vaibhav sooryavanshi house inside photos
2/8

वैभव सूर्यवंशी हा मूळचा बिहार राज्यातील समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर येथील रहिवासी आहे. येथे वैभव आपल्या कुटुंबासोबत राहतो. येथे वैभव आणि त्याचं कुटुंब त्याच्या जुन्या वडिलोपार्जित घरात राहतं.

 

vaibhav sooryavanshi house inside photos
3/8

वैभवच्या ताजपुर येथील घराचं सध्या रिनोव्हेशन काम सुरु असून त्याच्या घराला मुख्यत्वे गुलाबी रंग देण्यात आलाय. वैभवच्या घराजवळ नेट प्रॅक्टिससाठी सुद्धा जागा आहे.

 

4/8

वैभव सूर्यवंशीने वयाच्या ५ व्या वर्षांपासून हातात बॅट घेतली आणि क्रिकेट किट  घालून फलंदाज बनवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.  वयाच्या ७ व्या वर्षी, त्याला व्यावसायिक प्रशिक्षणासाठी समस्तीपूर येथील पटेल मैदानावर असलेल्या ब्रिजेश झा यांच्या प्रशिक्षण शिबिरात पाठवण्यात आले.

vaibhav sooryavanshi house inside photos
5/8

वैभवच्या वडिलांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘वैभवला क्रिकेटमध्ये करिअर करून देण्यासाठी वडिलांनी शेतजमिनीचा काही भाग विकला. पण वैभवने सुद्धा मग कष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि त्याला आज मेहनतीचं फळ मिळालं आहे’.

 

vaibhav sooryavanshi house inside photos
6/8

वैभव सूर्यवंशी यांचे वडिलोपार्जित घर आता एका नवीन आणि आकर्षक रूपात दिसणार आहे. यात वैभवच्या ट्रॉफी ठेवण्यासाठी एक विशेष जागा तयार करण्यात येणार असून घराला लावलेला गुलाबी रंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

vaibhav sooryavanshi house inside photos
7/8

वैभव सूर्यवंशीचं  घर हे दुमजली असून खालच्या भागात लिव्हिंग रूम आणि स्वयंपाक घर आणि वरच्या बाजूला टेरेस आणि बेडरूम आहेत.

 

vaibhav sooryavanshi house inside photos
8/8

वैभवच्या वडिलांनी मुलासाठी घराजवळ पीच तयार केली आहे. यातील एक पिच मातीची तर दुसरी सिमेंटची आहे.याच पीचवर वैभवने कोरोना काळात सुद्धा प्रॅक्टिस केली होती.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट

IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?

MS Dhoni: धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..

IPL Playoffs Qualification Scenarios 2026: दिल्लीच्या विजयानंतर 5 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफच्या 3 जागांसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?