टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सुनेत्रा पवार यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम? पक्ष सोडलेल्या त्या नेत्याचा गेम होणार? फडणवीसांकडे मोठी मागणी!

आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम? पक्ष सोडलेल्या त्या नेत्याचा गेम होणार? फडणवीसांकडे मोठी मागणी!

Sunetra Pawar : सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीत जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. तिन्ही पक्षातील सर्वोच्च नेत्यांच्या बैठका होत आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे यासारख्या जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावर चर्चा केली जात आहे. दरम्यान, एकीकडे जागावाटपाचे गुऱ्हाळ चाललेले असताना सुनेत्रा पवार यांच्या एका पत्राची चांगलीच चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे यांची नियुक्ती थांबवा अशी मागणी केली आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचे सांगिले जात आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आनंद परांजपे यांची  म्हाडाचे उपाध्यक्ष म्हणून करू नये. त्याऐवजी आम्ही लवकरच तुम्हाला दुसरे नाव सूचवू, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्या या कथित पत्राची सगळीकडे चर्चा होत आहे.

आनंद परांजपे यांनी दिला होता राष्ट्रवादीचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून आनंद परांजपे हे नाव चांगलेच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 मे रोजी त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादी पक्षात नाराज आहेत, असे बोलले जात होते. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात होते.

म्हणून सुनेत्रा पवार यांनी पाठवले पत्र

हा अंदाजही खरा ठरला. राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळेच आता सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, असे म्हटले आहे. तसेच परांजपे यांच्या जागी लवकरच आम्ही नवे नाव देऊ असे, सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी