टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पुणेकरांनी दुपारी घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता

पुणेकरांनी दुपारी घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता

पुणे, 3 मार्च (हिं.स.) : पुणे शहरात सध्या ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे. पुढील चार-पाच दिवसांमध्ये याच्या खालीच तापमान राहील. पण दुपारच्या वेळी उन्हाचा चटका लागणार आहे. म्हणून नागरिकांनी त्या कालावधीत घराबाहेर पडू नये, अन्यथा उष्णतेचा त्रास होऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्येही शिरूर, कोरेगाव पार्क सर्वाधिक ‘हॉट’ ठरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये कमाल तापमान वाढले असून, किमान तापमानही वाढले आहे. किमान तापमान १४ ते १५ अंशांवर होते, ते आता १७ अंशाच्या पुढे नोंदविले जात आहे. राज्यामध्ये सोलापूर ३७.९, मालेगाव ३७.६, जळगाव ३६.२, रत्नागिरी ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सध्या राज्यातही उष्णता जाणवत असून, ३ व ४ मार्च रोजी दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. यानंतर उत्तर दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे पुढील ४-५ दिवस राज्यातील दिवसभराचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे, असे कश्यपी यांनी सांगितले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सुनेत्रा पवार यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम? पक्ष सोडलेल्या त्या नेत्याचा गेम होणार? फडणवीसांकडे मोठी मागणी!

राज्याचे तीनही शिलेदार अजूनही दिल्लीतच… फडणवीस, शिंदे, पवारांच्या मुक्कामाचं कारण काय?

मोठी बातमी! शिवसेनेचा भाजपला पहिला मोठा धक्का, आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?