टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

On: May 28, 2026 6:59 PM
Follow Us:

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा
 राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या काही जागा अशा आहेत, त्या जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच आता भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघातून भाजपने  प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.  राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते उद्या दुपारी १.४५ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यातील १७ पैकी १४ मतदारसंघांत भाजप बहुमतात असल्याने ते ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत आहेत. दरम्यान भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला 4 जागांची ऑफर देण्यात आली आहे, परंतु शिवसेना शिंदे गट 6 जागांच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये.

जागा वटपाचा तिढा कायम असतानाच भाजपकडून आता आपला पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now