टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना

Solapur Accident News: सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर एक विचित्र अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यु झालाय.

Solapur Accident News: सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर एक विचित्र अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडलीय. देवदत्त दिलीप शिंदे (वय 20) आणि यशराज नाना शिंदे (वय 15) असे या दोघा  मुलांची नावे असून दोघेजण जत तालुक्यातील शेगाव गावा मधीलच रहिवाशी आहेत. अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरूण चालक म्हणून काम करीत होता. तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. दोघेही शेगावमध्ये राहत होते. मात्र या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

दुचाकी ट्रकखाली आल्याने चक्काचूर, दोघांच्या मृत्यूच्या घटनेने गावावर शोककळा 

पुढे आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दोघेजण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते. जतपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ आले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यशराज हा जागीच मृत झाला. तर गंभीर जखमी देवदत्तला जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अशातच अपघातात दुचाकी ट्रकमध्ये घुसून तीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. दुसरीकडे अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवून तेथून पळ काढला. जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलीय. पंचनामा करून मृत यशराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात आणलाय. अपघातात दोघे युवक मृत झाल्यामुळे शेगाव गावावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत असून पुढील तपास ही करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले

Election: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक; विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

पुणेकरांनी दुपारी घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी

सांगोल्याचा पुढील आमदार शहाजीबापू पाटीलच होणार; स्थानिक निवडणुकांच्या बेरजेनुसार शिवसेनेचे पारडे जड: उदय सामंत

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर