टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोने आणि चांदी दोन्हींचे दर धडाम, पाहा किती झाली किंमत?

On: November 8, 2026 8:18 PM
Follow Us:

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सोने आणि चांदी दोन्हींच्या दरात घसरणी होऊन बाजार बंद झाला.

Diwali Muhurat Trading 2026 : सोने आणि चांदी दोन्हींचे दर धडाम, पाहा किती झाली किंमत?

Diwali Muhurat Trading च्या दिवशी वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होऊन बाजार बंद झाला. जवळपास एक तासाच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यास सुरुवात केली.ज्यामुळे किरकोळ घसरण पाहायला मिळाली. एका क्षणी दोन्हींच्या किंमती ५०० रुपयांहून जास्त किंमत पाहायला मिळत होती. जाणकारांच्या मते महागाई अजूनही अस्तित्वात आहे. डिसेंबरच्या महिन्यात फेड रिझर्व्ह व्याज दरात एकीकडे वाढ करु शकते. ज्यामुळे येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदीच मोठा दबाव पाहायला मिळू शकतो. चला तर पाहूयात अखेर वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत काय बदल झाला…

किती स्वस्त झाले सोने

वायदा बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत घसरणी सह बाजार बंद झाला. सोने ३२ रुपये प्रति दहा ग्रॅस घसरणी सह १४२५२० रुपयांवर बंद झाले. या आधी सोन्याचे दर कामकाजाच्या सत्रात ५३३ रुपयाच्या उसळीसह १,४२,७०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले होते. तर शुक्रवारी किंमती १,४२,१६७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाल्या होत्या. तसे सोने वायदा बाजारात फ्लॅट १,४२,१६३ रुपयांवर ओपन झाले होते. जानकाराच्या मते येत्या दिवसात सोने आणि चांदी दोन्हींच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतो.

चांदीच्या दरातही घसरण

दुसरीकडे दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान चांदीचे दर वायदा बाजारात १.८५ लाख रुपयांच्या पार तर गेले, परंतू घसरणीसह बंद झाले. आकड्यांना पाहिले तर चांदीचे दर ८९ रुपये प्रति किलोग्रॅमच्या घसरणीसह १,८५,०११ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले. त्याच्या आधी कामकाजाच्या सत्रात ५५२ रुपये प्रति किलोग्रॅमच्या उसळीसह चांदी १,८५,३३९ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली होती. तसेच आज सकाळी चांदी उसळीसह १,८५,०६० रुपयांवर ओपन झाली होती. तसेच कामकाजाच्या सत्रात चांदीची किंमत १,८४, ८०० रुपयांसह दिवसाच्या नीच्चतम पातळीवरही गेले होते. शुक्रवारी चांदीचे दर अखेर १,८४,७८७ रुपयांवर बंद झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now