टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Dharashiv Fire Incident News: दिवाळीसाठी दोन्ही मुली गावी आल्या; संपूर्ण कुटुंबीयांसह आगीत होरपळल्या; धाराशिवमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

On: November 9, 2026 11:35 AM
Follow Us:

Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये दिवाळीत काल एक दुर्दैवी घटना घडली. धाराशिवच्या येडशीत घर जळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला

Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये दिवाळीत काल (8 नोव्हेंबर) एक दुर्दैवी घटना (Dharashiv Fire News) घडली. धाराशिवच्या येडशीत घर जळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एकजण बचावला आहे. किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री अचानक घरानं पेट घेतला आणि घरात असलेल्या सहा जणांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्यानं भिंती फोडून गावकऱ्यांनी धुराला वाट करुन देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एकाला वाचवण्यात यश आलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्नितांडवाने संपूर्ण गाव सुन्न झालंय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहाही जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक जण या आगीतून बचावला आहे. या कुटुंबातील सिद्धी आणि गायत्री दोन मुली शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या. एक मुलगी पुण्यात, तर दुसरी धाराशिवमध्ये शिक्षण घेत होती. दिवाळीचा सण असल्याने दोघीही आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गावी आल्या होत्या. मात्र ज्या दिवाळीच्या आनंदासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं, त्याच दिवाळीत काळाने या कुटुंबावर घाला घातला. (Dharashiv Fire Incident News)

तीन पिढ्यांपासून जपलेला किराणा व्यवसाय- (Dharashiv Fire Incident News)

तीन पिढ्यांपासून जपलेला किराणा व्यवसाय आणि घराचं स्वप्न क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. दरम्यान, आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासून शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाडीमध्ये पाणी आणि डिझेल उपलब्ध नसल्याने पाणी भरण्यासाठी आणि डिझेलची व्यवस्था करण्यासाठी वेळ गेला, असा दावा गावकऱ्यांनी केला. जेसीबीच्या साहाय्याने घराच्या भिंती पाडून आत अडकलेल्या कुटुंबीयांना गावकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

सदर घटनेत कुणाकुणाचा मृत्यू?

  • उत्तम त्रिंबक करंडे ,वय – 72
  • चंद्रकला उत्तम करंडे, वय – 65
  • गोविंद उत्तम करंडे,  वय – 55
  • ज्योती गोविंद करंडे, वय – 45
  • गायत्री करंडे, वय – 18
  • सिद्धी करंडे  वय, – 13

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now