टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rajendra Pawar Ajit Pawar: “काय बंधू?” अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले….

On: November 8, 2026 2:00 PM
Follow Us:

Rajendra Pawar Ajit Pawar: पवारसाहेब आजारी असताना तिथं प्रफुल्ल पटेल येऊन त्या संदर्भात काहीतरी चर्चा झालेली आहे. पण माझं वैयक्तिक मत वेगळं, रोहित दादांचं वेगळं असेल, पवारसाहेबांचं आणि सुप्रियांचं वेगळं असेल.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झाल्यानंतर ही पहिली दिवाळी आहे, जानेवारी महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं. त्यांच्या अकस्मित निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यामुळे पवार कुटुंबीय अजूनही दुःखी असून यावेळी दिवाळी साजरी करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं होतं, त्यानंतर  राजेंद्र पवार  (Baramati News Rajendra Pawar) यांनी आपल्या आणि अजित पवारांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या गोष्टी आणि किस्से  सोशल मिडीयावरती शेअर केल्या आहेत, अशातच एबीपी माझाशी बोलताना राजेंद्र पवार (Baramati News Rajendra Pawar) यांनी त्याबाबत भाष्य केलं आहे. तर प्रत्येक दिवाळीला पवार कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करत असतं, मात्र यंदाच्या वर्षी पवार कुटुंबीयात दिवाळी नाही. अजित पवारांच्या निधनामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी साजरी करणार नाही, असं पवार कुटुंबीयांनी आधीच सांगितलं होतं. मात्र, यावेळेस जे आहे ते राजेंद्र पवारांनी अजित पवारांच्या संदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिलेली आहे, काय आठवणी आहेत? काय भावना आहेत? त्यावरती राजेंद्र पवार म्हणाले, आम्ही दोघं भावंडं आहेत, तीन आमच्या थोरल्या बहिणी आणि बाकीच्या धाकट्या बहिणी. त्यामुळे आमच्यात अंतर फक्त एक वर्षाचं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही बालपण अनुभवलेलं आहे, ते मला वाटतं कुठल्याच भावंडांनी इतर एकत्रित अनुभवलेलं नाही. त्यामुळे अजित दादांच्या जाण्यामुळे किंवा या दिवाळीमुळे ज्या काही आठवणी आल्या आहेत, किंवा जी जुनी दिवाळी आम्हाला जी आठवत होती, त्या संदर्भात मी फक्त लिखाण केलंय, या पलीकडे काही नाही. (Baramati News Rajendra Pawar)

एक व्हिडिओ देखील तुम्ही शेअर केलाय, त्याबद्दल बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की, त्यांचं जे एक शब्द नेहमी असायचा, ‘काय बंधू?’ कारण माझा आणि त्यांचं नंतरच्या काळात, ते जेव्हा नेते झाल्यानंतर फारसं बोलणं नसायचं. परंतु कधीही भेटलं, तर पहिलं वाक्य त्यांचं ‘काय बंधू?’ असायचं आणि त्याचा जो आतून आलेला जो आवाज असायचा, तीच एक जवळकी नेहमी जाणवायची आणि तो आवाज सतत मला जाणवत राहिला. आठवण तर नक्कीच येते. (Baramati News Rajendra Pawar)

पुढे राजेंद्र पवार म्हणाले, जे लहानपण होतं, आजच्या तुम्ही जे पवार म्हणून सर्व लोक बघतात आणि त्यावेळची जी दिवाळी होती, ती दिवाळी शेतकऱ्याची दिवाळी होती आणि त्या काळात आजी-आजोबा हे आम्ही एकत्रित असताना सुद्धा, तरी कधी ते फरक करत नव्हते. ही भावाची मुलं, ही परक्याची मुलं, ही बहिणींची मुलं आणि माझी मुलं असा कधीही पवारांच्यात फरक केला गेलेला नाहीये. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे आमच्या आजी असतील, आजीनंतर आजी-आजोबांचे वडील सुद्धा समान वाटप करत होते आणि हौसेने सगळ्या भावंडांना म्हणजे आमचे सर्व भावंडं म्हणजे त्यांचे पुतणे असतील, त्यांची मुलं असतील, हे एकत्रितपणे कुठलीही गोष्ट आणून देत होते. आणि त्या काळात राजेश खन्ना हा खूप गाजलेला नट होता आणि अजित दादांना पहिल्यापासूनच अतिशय स्वच्छतेची आणि नीटनेटकेपणा राहण्याची आणि ती आवड असल्यामुळे मला वाटतं, त्यावेळी त्यांना ती फॅशन होती. ती राजेश खन्नाच्या कपड्यांची, ती त्यावेळी ते करायची. (Baramati News Rajendra Pawar)

यंदाच्या वर्षी पवारांची दिवाळी कशी सुरू आहे?

यंदाच्या वर्षी पवारांची दिवाळी कशी सुरू आहे? यावरती राजेंद्र पवार म्हणाले, मला वाटतं पवारसाहेब मुंबईला आहेत आणि हॉस्पिटलमधून ते घरी आले असतील आणि रोहित दादा हे संपूर्ण विदर्भ असेल किंवा मराठवाडा, विदर्भ तिकडे आहे. सर्व लोकांच्या ते वेळ देतायत आणि आम्ही इथे आहोत. त्यामुळे ही दिवाळी जिकडच्या तिकडं अशी एकत्रितली दिवाळी नाहीये आणि शांततेतली दिवाळी आहे, असंही ते म्हणाले.

एकत्र दोन्ही पक्ष विलीन होणार आहेत का? किंवा विलीन झाले, तर बीजेपीची साथ देणार आहेत का?

विलीनीकरणाच्या चर्चा आणि भेटीगाठीवर बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, मी काय ते फारसा ऐकलेलं नाहीये आणि मला असं समजतंय की, पवारसाहेब आजारी असताना तिथं प्रफुल्ल पटेल येऊन त्या संदर्भात काहीतरी चर्चा झालेली आहे. पण माझं वैयक्तिक मत वेगळं, रोहितचं वेगळं असेल, पवारसाहेबांचं आणि सुप्रियांचं वेगळं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की, या मताला फार काही महत्त्व नाहीये आता, माझ्या ॲंगलने. कारण विलिनीकरण खरंच होणार आहे का? एकत्र दोन्ही पक्ष विलीन होणार आहेत का? किंवा विलीन झाले, तर बीजेपीची साथ देणार आहेत का? या सगळ्या गोष्टी यातल्या, मला तर यातल्या काही माहित नाही आणि अजून मला वाटतं त्यांनी काही अशा स्पष्ट केलेल्या नाहीत. जर त्यांचं विलिनीकरण ठरलं असेल, तर मला वाटतं असं ऐकून आहे की 10 तारखेला या गोष्टी होतील आणि 10 तारखेला कदाचित ते सगळ्यांना सांगतील की बाबा कशा पद्धतीनी विलिनीकरण असेल आणि त्याच्या बदल्यात कशा कशात ते सपोर्ट देणार आहेत किंवा या सत्तेत ते सहभागी होणार आहेत का नाही? या गोष्टी, या पक्षाचे जे प्रमुख आहेत, तेच बोलतील.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

Eknath Shinde Shivsena : आमचा हक्क पाहिजे, नाहीतर..महायुतीत शिंदे शिवसेनेची आक्रमक भूमिका, भाजपवर राग

Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले

सराफा बाजारात मोठा उलटफेर, दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव गगनाला; आजचे रेट चिंता वाढवणारे

Accident News: उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा