टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

उंचीनुसार किती हवं वजन? डॉक्टरने सांगितलं एकदम सोप्पं गणित

On: June 2, 2026 10:50 AM
Follow Us:

Ideal Weight by Height: सध्या प्रत्येकजण आरोग्याविषयी जागरूक झाला आहे. बिस्किट बॉडीची पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्ये पण क्रेझ आहे. अनेक महिला जिममध्ये घाम गाळतात. वजन कमी करण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे. पण उंचीनुसार तुमचे आदर्श वजन किती हवे हे तुम्हाला माहिती आहे का?

उंचीनुसार किती हवं वजन? डॉक्टरने सांगितलं एकदम सोप्पं गणित

Ideal Weight by Height: सध्या शरीराच्या वाढत्या घेरामुळे अनेक जण परेशान आहेत. त्यांना फिट बॉडी हवी आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण आटापिटा करत आहेत. पण तुमच्या उंचीनुसार किती वजन हवे हे अनेकांना माहिती नसते. त्याविषयीची माहिती नसते. अनेकजण स्वतःला ओव्हरवेट मानतात. केवळ वजन मोजणे पुरेशे नसते. तर उंचीनुसार वजनाला महत्त्व असते. तज्ज्ञांच्या मते आदर्श वजन (Ideal Weight) माहिती असणे आवश्यक आहे. योग्य वजनामुळे तुमचे फिटनेस, हृदयाची मजबुती, रक्तदाब, मधुमेह, सांध्यावरील वजन याची माहिती, अंदाज मिळतो.

उंचीनुसार किती हवे वजने?

तज्ज्ञांच्या मते, जर उंचीनुसार, वजन कमी आणि जास्त असेल (Why is Weight Important in Relation to Height?) तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. अधिक वजन असेल त्याचा परिणाम वजन, फॅटी लिव्हर, हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. कमी वजन असेल तर कमजोरी, थकवा आणि रोग प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन संतुलित असणे आवश्यक आहे. आदर्श वजनापेक्षा अधिक वजन असेल तर धाप लागणे अथवा इतर आजार बळवण्याची शक्यता आहे.

BMI काय आहे, का असते महत्त्वाचे

उंचीनुसार वजन किती आहे याचे मोजमाप, त्याचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी BMI (Body Mass Index) हे योग्य मापक मानल्या जाते. त्यानुसार वजन आणि उंची यानुसार व्यक्ती वजनदार आहे की कमी वजनाची हे समोर येते. महिलांचे वजन पुरुषांपेक्षा कमी असते. कारण त्यांची शारीरिक रचना वेगळी असते.

BMI मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला?

BMI = वजन (किलो) भागिले (उंची मीटर मध्ये × उंची मीटरमध्ये)

BMI नुसार वजनाची श्रेणी

18.5 पेक्षा कमी – कमी वजनी

18.5 ते 24.9 -साधारण वजन

25 ते 29.9 – जाड

30 पेक्षा अधिक – लठ्ठपणा

वजनानुसार आदर्श वजन किती? (Ideal Weight According to Height)

5 फूट (152 सेमी) – 45 ते 55 किलो

5 फूट 3 इंच (160 सेमी)- 50 ते 60 किलो

5 फूट 6 इंच (168 सेमी) – 55 ते 67 किलो

5 फूट 9 इंच (175 सेमी) – 62 ते 75 किलो

6 फूट (183 सेमी) – 68 ते 85 किलो

हे सुद्धा वाचा

Horoscope Today 2nd June 2026 : घरच्यांशी होऊ शकतं भांडण, आज जीभेवर ठेवा साखर आणि.. या राशीच्या डोक्याला ताप ?

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now