टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

On: November 1, 2026 12:22 PM
Follow Us:
Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

Diwali 2026: दिवाळी सणाला सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळातील गोडाचे पदार्थ बनवले जातात. चकली, लाडू, करंजी, मिठाई इत्यादी विविध पदार्थ बनवले जातात. पण दिवाळी पाडव्यासाठी जरा हटके आणि टेस्टी पदार्थ बनवायचा असल्यास सीताफळ बासुंदी उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात सीताफळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. सीताफळ बासुंदी आणि पुरी हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय भन्नाट लागते. घट्टसर दूध, सीताफळ आणि केशराचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. बासुंदी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.त्यामुळे बासुंदी तुम्ही आधी सुद्धा बनवून ठेवू शकता. दिवाळीच्या पाहुणचारासाठी किंवा सणाच्या खास जेवणासाठी विकतचे पदार्थ आणण्याऐवजी सीताफळ बासुंदी बनवावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य:

  • सीताफळ
  • दूध
  • मिल्क पावडर
  • साखर
  • केशर काड्या
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • गुलाबाच्या पाकळ्या

कृती:

  • सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी, सीताफळचा गर काढण्यासाठी चाळणीमध्ये सीताफळ सोलून त्यातील गर काढून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • दूध घट्टसर झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार साखर, वेलची पावडर आणि केशर काड्या घालून मिक्स करा.
  • गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर त्यात सीताफळाचा गर आणि सुका मेवा घालून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली सीताफळ बासुंदी. हा पदार्थ पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now