Mumbai : मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Threatening message : गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याचा धमकीचा मेसेज पाकिस्तानी नंबरवरुन आला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळतंय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे फोन येण्याचे सत्र हे वाढल्याचे बघायला मिळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला उडवून देण्याचा धमकीचा फोन हा काही दिवसांपूर्वीच आला. त्यानंतर बुलढाण्यातून दोघांना पोलिसांनी अटक केली. धमक्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता थेट पाकिस्तानी नंबरवरुन मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा धमकीचा मेसेज आलाय. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज आला. यानंतर पोलिस प्रशासन चांगलेच अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या धमकीच्या मेसेज प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. हैराण करणारे म्हणजे हा मेसेज एका पाकिस्तानी नंबरवरून करण्यात आलाय. वरळी पोलिसांनी या धमकीच्या मेसेज प्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी हा मेसेज आल्याची माहिती मिळतंय.

आता या धमकी प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय. धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव शहाबाज हुमायून राजा देव असल्याचे सांगितले आहे. मेसेज करणारी व्यक्ती ही भारतातील की बाहेरील याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. हा मेसेज वरळी वाहतूक विभागाला आल्याची माहिती आहे. हा मेसेज व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आले की, आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावर मोठ्या प्रमाणात हल्ला करू.

गुन्हा दाखल पोलिसांचा तपास सुरू

मेसेजसोबतच त्याने आपले नाव देखील सांगून टाकले. आता प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जातोय. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या, राजकिय नेते, बॉलिवूड कलाकार यांना गेल्या काही दिवसांपासून सतत अशाप्रकारच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडून देण्याची धमकी प्रकरणात आरोपीने मित्राचा बदला घेण्यासाठी अशाप्रकारे धमकी पाठवल्याचे स्पष्ट झाले होते.

आणखी वाचा 

Benefits of Garam Masala: गरम मसाल्याचे सेवन केल्यामुळे ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

पाणी प्यायला गेला आणि अडकला, दत्तात्रय गाडेच्या मुसक्या कशा आवळल्या ? मध्यरात्री अटकेचा थरार

Coriender Water: रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon