AFG vs AUS : अफगाणिस्तान इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाला दणका देणार?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Afghanistan vs Australia Icc Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 28 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर बी ग्रुपमधील सेमी फायनलचं चित्र स्पष्ट होणार आहे.

अफगाणिस्तान टीमने गेल्या काही वर्षात क्रिकेट विश्वात यशस्वीरित्या आपली छाप सोडली आहे. अफगाणिस्तानने आयसीसी स्पर्धेत अनेक संघांना लोळवत आपण काय आहोत, हे दाखवून दिलंय. अफगाणिस्तानने 2023 साली भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला पराभूत केलं. अफगाणिस्तानचं वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी राहिली. अफगाणिस्तान यासह पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरली. अफगाणिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेत विजयी सुरुवात करता आली नाही. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र अफगाणिस्तानने करो या मरो सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला आणि स्पर्धेतील आव्हान कायम राखलं. सोबतच इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर फेकलं. अफगाणिस्तानचा हा इंग्लंडविरुद्धचा आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.

आता अफगाणिस्तान 28 फेब्रुवारीला साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडला पराभूत केल्याने अफगाणिस्तानचा विश्वास दुणावलेला आहे. तसेच अफगाणिस्तानकडे उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ही शेवटची संधी आहे. अफगाणिस्तानसमोर या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 350 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात प्रत्येकी 3-3 गुण आहेत. तर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानकडे 2 गुण आहेत. अफगाणिस्तानच्या विजयामुळे बी ग्रुपमध्ये उपांत्य फेरीसाठी 3 संघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

अफगाणिस्तानने हा सामना जिंकल्यास ते थेट उपांत्य फेरीत पोहचतील. अफगाणिस्तानने राशीद खान याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली होती. त्यामुळे अफगाणिस्तान यंदा हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात सेमी फायनलमध्ये पोहचत इतिहास घडवणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, सीन ॲबॉट आणि सीन ॲबॉट.

अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, नांगेलिया खरोटे आणि नावेद झाद्रान.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी दुबईच्या रस्त्यांवर तौबा गर्दी

Coriender Water: रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

60 दिवसांचा Airtel प्रीपेड प्लॅन, अहो दोन महिने रिचार्जचं नो टेन्शन, फायदे वाचा

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon