पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्याला अटक केली. दत्तात्रय हा शिरूर येथील गावातील शेतात लपला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. आरोपी हा गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर तो गावातून पळू नये म्हणून गावात 100 पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच ड्रोनच्या आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा कसून शोध घेत अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तब्बल 48 तासानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डॉग स्क्वायड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. अखेर 48 तासानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला अटक केली. तो एका कॅनॉलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गावातल्या शेतात अनेक तास शोधमोहिन केल्यानंतर अखेर त्याच शोध लागला. पोलिसांनी शेत पिंजून काढत त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणून ठेवलं आहे. आज सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार
1) आरोपी दत्तात्र गाडे हा गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
2) काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही.
3) रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता.
4) तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली.
5) पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच गाडेला चारही बाजूंनी घेरलं
6) ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला तू बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा पोलिसांनी केली
7) त्यानंतर कॅनालच्या खड्ड्यात लपलेला दत्ता गाडे हा आरोपी बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली
8) मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
9) महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षीा जास्त हे सर्च ऑपरेशन सुरू होतं.
10) गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.
AFG vs AUS : अफगाणिस्तान इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाला दणका देणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार बदलणार ?