Captain : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार सुरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी खेळाडूने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर बी ग्रुपमधून अजून सेमी फायनलसाठी चुरस पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला 26 फेब्रुवारीला 8 धावांनी पराभूत केलं. तर आता इंग्लंड या मोहिमेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 मार्च रोजी खेळणार आहे. तर टीम इंडिया 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध साखळी फेरीतील अंतिम सामना खेळणार आहे. याआधी क्रिकेट विश्वातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान कर्णधाराने नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.
जोस बटलर याने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजनीमा दिला आहे. अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान बटरलच्या कॅप्टन्सीचा द एन्ड झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला बुधवारी पराभूत केलं. इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र अफगाणिस्तानने या रंगतदार झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. इंग्लंडचं अशाप्रकारे या पराभवासह आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. त्यानंतर जोस बटलर याने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय केला आहे.
1 मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार
दरम्यान इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेत साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडचा या सामन्यात विजय मिळवून मोहिमेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यात यश मिळणार की दक्षिण आफ्रिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा