Benefits of Garam Masala: गरम मसाल्याचे सेवन केल्यामुळे ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Garam Masala Benefits : निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये गरम मसाल्याचा समोवेश करणे गरजेचे असते. गरम मसाल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. गरम मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये गरम मसाल्याचा उपयोग केला जातो. शाराहारी किंवा मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये गरम मसाल्याचा वापर केला जातो. गरम मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, वेलची आणि काळी मिरी यांसारख्या उबदार मसाल्यांचे मिश्रण केले जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? गरम मसाला फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरतो. तुम्ही जर जास्त तिखट खाण्यास पसंती देत असाल तर गरम मसाल्याचे थोडं कमी प्रमाणात सेवन केले पाहिजेल. गरम मसाला खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

मसाल्यांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. भारतीय मसाल्यांमध्ये गरम मसाला प्रमुख्याने वापर केला जातो. चमचमीत आणि तिखट खाण्यासाठी गरम मसाल्याचा वापर केला जातो. गरम मसाल्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला तुम्हाला सर्दी, खोकला आणि ताप यांच्या सारखे आजार होत नाही. गरम मसाल्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि दालचिनीचा उपयोग केला जातो. ज्याच्या आपल्या आरोग्याला देखील फायदा होतो.

हिवाळ्यामध्ये भजी, पापड आणि छोले भटूरे यांना जास्त प्रमाणात पसंती देतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात गरम मसाल्याचा वापर केला जातो. गरम मसाल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दालचिनी आणि इतर मसाल्यांमध्ये असलेले फायबर तुमच्या पोटचे आरोग्य निरोगी राहाण्यास महक होते. गरम मसाल्याचा नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या आतड्यांना मजबूत होण्यास मदत होते. गरम मसाल्यांमध्ये दालचिनी एक प्रमुख घटक आहे. दालचिनीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. गरम मसाल्याचे सेवन मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. गरम मसाल्यांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या शरीरावरील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रूग्णांनी जिरे आणि दालचिनीचे सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते. गरम मसाल्यांमधील अँटिऑक्सिडेंट्स तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अँटिऑक्सिडेंट्स मुळे तुमच्या त्वचे संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. गरम मसाल्याचा सेवन केल्यामुळे पिंपल्स आणि मुरूम सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

गरम मसाल्याचे तोटे :

1) जास्त प्रमाणात गरम मसाले खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

2) गरम मसाला जास्त प्रमाणात खाल्ल्यास मूळव्याध सारख्या समस्या होतात.

3) जास्त प्रमाणात गरम मसाला खाल्ल्यामुळे तुम्हाला अँसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

4) गरम मसाले जास्त प्रमाणात वापर केल्यास तुम्हाला पोटासंबंधित समस्या होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

पाणी प्यायला गेला आणि अडकला, दत्तात्रय गाडेच्या मुसक्या कशा आवळल्या ? मध्यरात्री अटकेचा थरार

AFG vs AUS : अफगाणिस्तान इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाला दणका देणार?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी दुबईच्या रस्त्यांवर तौबा गर्दी

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon