मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय, त्यांना पदमुक्त केलंय; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Devendra Fadnavis on Dhananjay Munde Resignation : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) का घेतला जात नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. यानंतर सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे याच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. यानंतर आज मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो राज्यपाल महोदयांकडे पाठवला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आलेला आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया 

मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मला काहीच माहिती नाही. मला खरंच काही माहिती नाही, मला आधी पाहू द्या. मी फोन देखील घेतले नाहीत. तुम्ही प्रोटोकॉल पाळा, मी येऊन तुम्हाला व्यवस्थित सांगते, मी विमानातून आताच उतरले आहे, मला याबद्दल अजून काही माहिती नाही, राज्यपाल महोदयांसोबत मी आहे, मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन माध्यमांशी बोलते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया? 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, आज राज्य सरकारनं राज्यावर मोठे उपकार केलेत. त्यांना खरंतर उचलून फेकायला हवं होतं. काल समोर आलेले फोटो, त्यात काय आहे हे साऱ्या राज्याला माहिती होतं. तरी तीन महिने लागतात? कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांना माहिती होती. विरोधी पक्षानं काय केलं? यांना केवळ राजकारण करायचंय. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकारण्यांच्या मर्जीनं करणं आधी बंद करा. यासाठी मी लवकरच एक याचिका हायकोर्टात करणार आहे. आज जर मुंडेंचा राजीनामा झाला नसता तर, मी जनतेला आवाहन केलं होतं की हे अधिनेशनच बंद पाडा, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

या घडीची सर्वात मोठी बातमी ! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

फॅबटेक इंजिनिअरींग चे प्रा. डॉ. नाना गावडे यांच्या संशोधनास जर्मन पेटंट

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये टेक्नोफॅब कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon